Posts

राणी व्हिक्टोरिया वरचे भारतीयांचे प्रेम.

Image
१८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरची सत्ता गेली आणि भारतावर कंपनी सरकार च्या जागी ब्रिटीश सरकारचे अर्थात राणी व्हिक्टोरिया चे राज्य सुरु झाले हे आपल्याला माहितीच आहे. राणी व्हिक्टोरियाचा तत्कालीन पुतळा. (मथुरा संग्रहालय) म्हणजे सरकार कंपनीचं असो किंवा राणीचं, बहुतांश भारतीय लोकांच्या मनात ब्रिटीश लोकांविषयी साहजिकच चीड होती. सात-आठ हजार मैलावर असलेल्या आणि कधी भारतात पायही न ठेवलेली तत्कालीन भारताची राणी अर्थातच भारतीयांत विशेष लोकप्रिय वगैरे नव्हती. सामान्य भारतीयांना तिची सत्ता, सामर्थ्य, अधिकार याची देखील व्यवस्थित कल्पना नव्हती. भारतात बऱ्याच ठिकाणी उभ्या केलेल्या तिच्या पुतळ्यांवरुन भारतीयांचं मनात तिचं चित्र, एक मुकुट घातलेली म्हातारी, इतकंच असावं पण २२ जानेवारी १९०१ म्हणजे राणी गेल्यावर तिच्या दफनविधी दिवशी (२ फेब्रुवारी) भारतीयांनी आपलं एक वेगळंच स्वभाव वैशिष्ट्य ब्रिटीश लोकांना दाखवलं. त्याचं झालं असं कि २ फेब्रुवारी रोजी हजारो माणसे अचानक ब्रिटीश लोकांविषयीचा आपला राग टाकून देऊन राणी ला श्रद्धांजली द्यायला कलकत्त्यातल्या एका मैदानात जमली. आणि हि मंडळी